शिवरक्षक वीर जिवाजी महाले जयंतीनिमित्त निरा येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव.

              पुरंदर रिपोर्टर लाईव्ह.   

नीरा  प्रतिनिधी  

      जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी कै. जी. डी. गायकवाड सामाजिक संस्था, निरा शहर व पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवरक्षक, शिवरत्न, वीर जिवाजी महाले यांच्या ३९० व्या जयंतीनिमित्त श्री. विठ्ठल मंदिर सभागृह, निरा येथे एक  कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या प्रसंगी समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


नाभिक समाजातील ग्राम महसूल अधिकारी म्हणून निवड झालेल्या  सुरज दिलीप गोरे (लोंणद), तसेच मंडलाधिकारी भाऊसाहेब देवकर यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर निरा येथील मंगेश ढमाळ, तसेच संस्थेचे नेते  अमर झेंडे यांना महाराष्ट्र शासनाचा नाट्य रंगभूमीकार पुरस्कार २०२५ प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडलाधिकारी भाऊसाहेब देवकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना संस्थेचे सचिव  आदिनाथ गायकवाड यांनी केली, तर आभारप्रदर्शन अमर झेंडे यांनी मानले.


या वेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित मान्यवरांना चहा व अल्पोपहार देण्यात आला.

Post a Comment

0 Comments